गडचिरोली : गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान बॅण्डेज पट्टी आणि कापूस पोटातच ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गडचिरोली तालुक्यातील कनेरी (टोला) येथील ही घटना आहे. लालनी नैताम यांनी मुलगी कांता शर्माला 10 ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता रुग्णालयात पहिल्या प्रसुतीसाठी दाखल केले. मात्र प्रसुतीला वेळ असल्याचे कारण देत परिचारिकेने तब्बल 10 तास तात्कळत ठेवले.
संध्याकाळच्या सुमारास परिचारिकेने प्रसुतीसाठी कांता शर्माला शस्त्रक्रिया गृहात दाखल करुन घेतले. 7.50 वाजता कांता शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुतीनंतर तब्बल दोन तास कांताकडे दुर्लक्ष केले गेले. नऊ वाजताच्या सुमारास कांतावर छोटीसी शस्त्रक्रियाकरुन टाका मारण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. या बाबतची विचारणा केली असता, परिचारिकेने उलट उत्तर देत तुम्हाला जमते तर तुम्हीच करा, असे बजावले. परिचारिका एवढ्यावर बोलून थांबली नाही तर एवढच होतं तर घरीच प्रसुती का केली नाही, असे बोलून घरच्यांना अपमानित केले.
रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर टाका मारताना पोटात बॅण्डेज पट्टी आणि कापूस पोटातच राहीला. 12 ऑक्टोबरला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर मुलीला चालण्यास, बोलण्यास आणि बसण्यास त्रास होवू लागला. 27 ऑक्टोबरला स्वच्छतागृहात गेली असता बॅण्डेज पट्टी व कापूस बाहेर पडले. गावातील आरोग्य सेविका सुनंदा सुपारे यांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीच कांता शर्माला औषधे लिहून दिले. तसेच रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही दिला नाही.
मंगळवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेऊन पीडित महिला व तिच्या आईने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेमुळे महिला व बाल रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला. या प्रकरणात दोशी असलेल्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रसुतीनंतर कापूस, बॅण्डेज पट्टी पोटात, महिला-बाल रुग्णालयातील प्रकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2018 09:03 AM (IST)
मंगळवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेऊन पीडित महिला व तिच्या आईने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेमुळे महिला व बाल रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -