माझा कट्टा: सुप्रसिद्ध लोककलावंत मंगला बनसोडे यांच्याशी गप्पा
याबाबत बोलताना तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर म्हणाले की, राज्यातील जेवढे तमाशांचे फड मालक आहेत. त्यांच्याकडे 100 ते 125 लोक काम करत असतात. सध्याच्या परिस्थितीत काम बंद झाल्यामुळे आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती आणखी किती दिवस राहिल याबाबत अद्याप तरी काही सांगता येतं नाही. आम्हांला राज्यातील अनेक गावातून तमाशाच्या तारखा मिळाल्या होत्या. त्याच्या आशेवर आम्ही काही रक्कम कलाकारांना दिली होती. परंतु आता तमाशेच रद्द झाल्यामुळे राहिलेले पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे कलाकारांना काहीच पैसे देता येणार नाहीत. जर अशीच परिस्थिती राहिली तर कलावंताचं जगणं मुश्किल होईल. सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि निदान या कलाकारांपर्यंत किराणा माल तरी पोहचावा याची व्यवस्था करावी.
मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले की सध्या आमचे प्रयत्न ज्युनिअर आर्टिस्ट आणि तमाशा कलावंतांना जगवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आम्ही शक्य तितक्या कलाकारांना किराणा देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आम्हांला देखील मर्यादा आहेत. आम्हांला सरकारने मदत केल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात कलाकारांना मदत करू शकू.