मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशामध्ये आता मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आस्मानी संकटामुळे चिंतेत आले आहेत. रविवारी (19 एप्रिल) मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे.


मराठवाडा, विदर्भ, यवतमाळ, इंदापूर, चंद्रपूर, कोल्हापूर सोलापूर, येथे अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. बोरांच्या आकाराच्या गारा काही भागांमध्ये पडल्या. त्यामुळे आंबा, द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत सोयाबीन,तुर आणि चना जो व्यापाऱ्यांनी खरेदी करून खुल्या मैदानात ठेवला होता तो देखील भिजल्याने व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदील झाला आहे


इंदापूर :
इंदापूर तालुक्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपले. तर इंदापूर तालुक्यातील काटी व बावडा भागात गारांसह मोठा पाऊस पडला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.


यवतमाळ :
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात रात्री आणि पहाटे विजांच्या कडकडासह पाऊस पडला.
वणी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सोयाबीन,तुर आणि चना जो व्यापाऱ्यांनी खरेदी करून खुल्या मैदानात ठेवला होता तो देखील भिजला आहे .या अवकाळी पावसाने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.



चंद्रपूर :
चंद्रपूर शहरात रात्री फक्त एका तासात तब्बल 56 मिली मीटर पाऊस पडला. शहरात प्रचंड वादळ, गारपिटीसह पावसाने शहर-जिल्ह्याला झोडपले.


Special Report | 10 फुटांवरच्या लेकराला न भेटू शकणारा पोलिस बाबा, कोरोनामुळे कुटुंबाची ताटातूट



संबंधित बातम्या :