औरंगाबादमध्ये मनसेचा तिथीनुसार शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते शिवपूजन पार पडलं. यावेळी फेटा बांधून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आला. सर्व सण तिथीनुसार साजरे होतात, त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्याचे राज यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशात आधीच इतकी रोगराई, त्यात आणखी एकाची भर पडली तर काय फरक पडतो. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहेच, पण महाराष्ट्रात कोरोनाच्या फारशा काही केसेस नाहीत. कुणीही दगावलेलं नाही. असं असताना प्रशासनाकडून अनेक गोष्टींवर बंदी घातली जातेय. परवानगी नाकारली जातेय. कशासाठी लोकांना विनाकारण घाबरवत आहात? असा सवालही राज ठाकरे यांनी काल, बुधवारी केला होता.
Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 9; राज्यात एकूण 12 कोरोनाग्रस्त
राज ठाकरे म्हणाले की, काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे याबद्दल दुमत नाही. पण कोरोनाच्या नावानं ज्या प्रकारे आव आणला जातोय, त्याला काही अर्थ नाही. आपल्याकडं इतर अनेक प्रकारची रोगराई आहे. माझ्या माहितीनुसार देशात दिवसाला 400 लोकं टीबीनं मरतात. वर्षाकाठी हा आकडा दीड लाखांच्या आसपास आहे. इतकी रोगराई इथं आधीच असताना कोरोनावरून एवढा गोंधळ का माजवला जातोय? नाशिकला 144 कलम लावलंय. कशासाठी लोकांना घाबरवताय? पोलिसांना याची नेमकी किती माहिती आहे, असा सवाल राज यांनी केला.
#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचं नाव सांगून शिवजयंतीला परवानगी नाकारत असाल तर संभाजीनगरच्या निवडणुका अवघ्या 25-30 दिवसांवर आल्यात. त्या पुढं ढकलणार आहात का? कारण, हा एक-दोन दिवसांचा आजार नाही. अजून त्यावर औषध सापडलं नाही. मग निवडणुकांवरही निर्णय घ्या, असंही राज ठाकरे म्हणाले.