मुंबई : राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसने गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 136 वर पोहोचली आहे. गुरुवारी (26 मार्च) दिवसभरात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर आज सकाळी नागपूरमध्ये चार आणि गोंदियात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.


दरम्यान, राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा पाचवर गेला आहे. वाशीतील एका खासगी रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.





पिंपरीतील तीन रुग्ण कोरोनामुक्त
पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमधील पहिले तिन्ही रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. काल (26 मार्च) त्यांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यासाठी नमुने पाठवले होते. आज (27  मार्च) त्यांना डिस्चार्ज दिलं जाईल. या तिन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं 11 मार्चला सिद्ध झालं होतं. हे तिन्ही रुग्ण पुण्यातून डिस्चार्ज झालेल्या दाम्पत्यासोबतच दुबईला गेले होते.


Coronavirrus | राज्यातील आठ खाजगी लॅबना कोरोना तपासणी केंद्राची मान्यता, अमित देशमुखांची माहिती


राज्यातील जिल्हा आणि महापालिकानिहाय रुग्णांची आकडेवारी
मुंबई - 51
पिंपरी चिंचवड - 12
पुणे - 20
सांगली - 11
नवी मुंबई -5
कल्याण-डोंबिवली - 5
नागपूर - 9
ठाणे - 5
यवतमाळ - 4
अहमदनगर - 3
सातारा - 2
कोल्हापूर - 2
पनवेल - 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद -1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1
सिंधुदुर्ग - 1
गोंदिया - 1
एकूण = 136
मृत्यू - 5वसई-विरार - 1
सिंधुदुर्ग - 1
एकूण = 135
मृत्यू - 5


देशात कोरोना रुग्णांची संख्या 728
भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 729 झाली आहे. त्यापैकी 656 जणांवर अजूनही उपचार सुरु आहे आणि 50 जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत या व्हायरसची लागण झाल्यानंतर 18 जणांचा मृत्यू झाला आहे.


कोणत्या राज्यात किती मृत्यू?
सर्वाधिक पाच मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तर गुजरात 3, कर्नाटकमध्ये 2 बळी गेले आहेत. याशिवाय दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सरकारकडून जागरुकतेसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला वारंवार दिला जात आहेत.