पालघर :  कोरोनाचे संक्रमण व प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त लोक जमा होऊ नयेत यासाठी पालघर जिल्हाधिकारी यांनी रविवारी संध्याकाळी आदेश देत शाळा, महाविद्यालय, रिसॉर्ट व हॉटेल 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यासाठी सांगितले आहेत. त्यामुळे पालघरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केळवे चौपाटीवर सोमवारी पर्यटकांचा शुकशुकाट पहायलास मिळाला.

पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात वसई ते झाई ही किनारपट्टी पर्यटकांचे आकर्षण मानले जाते. या किनारपट्टी भागातील केळवे बीच हे पर्यटकांसाठी आकर्षाणाचं केंद्र आहे. रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक मुंबई,नाशिक ,गुजरात मधून येथील प्रसिद्ध शितलादेवीचे दर्शन घेण्यासाठी आणि मजा लुटण्यासाठी ह्या पर्यटनस्थळी हजेरी लावत असतात. पण सध्या कोरोनोचे संकट घोंगवू लागल्याने पालघर आपत्ती व्यवस्थापनाने ह्या सर्वच ठिकाणी सुरक्षेचे उपाय म्हणून निर्बंध लावले आहे. त्यामुळे पालघरमधील महत्वाच्या चौपाट्या ओस पडलेल्या पाहायला मिळतं आहे.

तर दुसरीकडे स्थानिक यंत्रणांनी ह्या संकटाची सावधगिरी म्हणून मंदिर आणि बीच प्रवेश द्वारावर सुरक्षात्मक सूचनांचे फलक लावले आहेत. बीच वरील सर्व स्टॉल्स रिकामे करण्यात आले असून येणाऱ्या पर्यटकांना ही आत मध्ये प्रवेश बंद केला आहे.

बीचवरील सर्व स्टॉल बंद ठेऊन रिकामे करण्यात आले असून येणाऱ्या पर्यटकांना ही चौपाटीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हिरमुसल्या पावलांनी घरी परतावे लागत आहे. तर ह्याच पार्श्वभूमीवर त्या भागात असलेली रिसॉर्ट आणि फार्म हाऊस यांच्यावर सुद्धा जिल्हा पत्ती व्यवस्थापनाकडून निर्बंध लादण्यात आले असून कोणत्याही पर्यटकाला प्रवेश न देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या सुचनेचे तंतोतंत पालन रिसॉर्ट आणि हॉटेल मालक ही करत आहेत. त्यामुळे नेहमीच गर्दी असलेल्या केळवे पर्यटनस्थळी पर्यटकांचा शुकशुकाट पहावयास मिळाला. या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे रिसॉर्ट व हॉटेल व्यवसाय 15  दिवस बंद राहणार असल्यामुळे या व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

Village News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा



राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 39 वर पोहोचला

राज्यातील स्थिती :-

पिंपरी चिंचवड - 9
पुणे- 7
मुंबई - 6
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड, ठाणे, अहमदनगर,औरंगाबाद - प्रत्येकी 1
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - 39