व्हायरसच्या भीतीपोटी रंग विक्रेत्यांवर मात्र चांगलीच उपासमारीची वेळ आली आहे. अनेक वर्षापासून होळी आणि रंगपंचमी निमित्त रंग विकणारे व्यापारी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहेत. दरवर्षी लाखो रुपयांची होणारी उलाढाल यावर्षी हजारात येऊन पोहोचली आहे. रंगातून कोरोना होतो किंवा नाही याबाबत मात्र ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच चर्चांमुळे परिणाम मात्र रंगांच्या बाजारपेठेवर झाला आहे. हिंगोलीच्या बाजारात आणि ग्रामीण भागात उन्हातान्हात दुकाने थाटून बसलेले व्यापारी, मात्र ग्राहक नसल्याने चांगलेच अडचणीत आले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केले.
CoronaVirus Outbreak | कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अशी घ्याल काळजी