बुलडाणा : सध्या सगळीकडे कोरोना, त्यामुळे लॉकडाउन आणि या सगळ्यामुळे समाजात एक प्रकारची नकारात्मकता तयार झाली आहे. अशा वातावरणात प्रत्येकाला काहीतरी नवीन हवं आहे. देशातून जर कोरोना व्हायरसला संपवायच असेल तर प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी. त्यासाठीच राज्य सरकारने ‘आपले कुटुंब, आपली जवाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. शनिवारी त्याचा शेवटचा दिवस होता. गावातील नागरिकांना कोरोना बद्दल जागरूक करने हे प्रत्येकाच कर्तव्य आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेच आहे.


बुलडाणातील मेहकर तालुक्यातील गवांढला या गावच्या महिला सरपंच श्रीमती ताईबाई गजानन जाधव यांनी नेमक हेच ओळखून नागरिकांना जागृत करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. सरपंच श्रीमती ताईबाई गजानन जाधव यांनी चक्क आपल्या पतीला अस्वलाच्या रुपात रस्त्यावर उतरविले.


"मै कोरोना हूं, रास्ते में रहता हूं, हवा मैं खेलता हूं, मास्क नही लगाया तो, अंदर घुसता हूं," असा संदेश देत संपूर्ण शहरामधून जनजागृती केली. अचानक समोर अस्वल दिसताच नागरिकांनी कुतूहलाने बघत यावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. संपूर्ण मेहकर शहरातून या महिला सरपंचाने आपल्या पतीला फिरवून, लाउड स्पीकरद्वारे जनतेला कोरोनाबद्दल जागरूक केलं आहे. पोलिस स्टेशन, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि नागरिकांनी देखील या मोहिमेचं कौतुक केलं आहे.


या अस्वलाला बघून नागरिकांच्या मनात कोरोना बद्दलजनजागृति किती होईल हा प्रश्नच आहे. पण या निमित्ताने नागरिकांना कोरोनाला हरवायच असेल तर काय काळजी घ्यावी या बद्दल जनजागृति झाली.



नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार?  


राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातचं आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.