मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2190 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56,948 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. . राज्यात आतापर्यंत 1897 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1168 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.5 दिवस होता. तो आज 14.7 दिवस झाला आहे.
आज झालेल्या 105 मृत्यूपैकी 32 जण मुंबई, ठाण्यात 16, जळगाव 10, पुण्यात 9, नवी मुंबई, रायगड 7, अकोला 6, औरंगाबाद 4, नाशिक, सोलापूर 3, सातारा 2, तर अहमदनगर, नागपूर, नंदूरबार, पनवेल, वसई विरारमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.5 टक्के एवढे आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 3 हजार 976 नमुन्यांपैकी 56,948 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 701 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 37 हजार 761 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 17, 918 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या सुमारे 12.4 टक्के तपासणी राज्यात झाली असून दर दहा लक्ष लोकसंख्येमागे राज्यात 3142 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण देशपातळीवर 2363 एवढे आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 72 पुरुष तर 33 महिला आहेत. त्यातील 50 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 45 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 10 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 105 रुग्णांपैकी 66 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 56,948
मृत्यू - 1897
मुंबई महानगरपालिका- 34,018 (मृत्यू 1097)
ठाणे- 510 (मृत्यू 5 )
ठाणे महानगरपालिका- 3048 (मृत्यू 68)
नवी मुंबई मनपा- 2294 (मृत्यू 39)
कल्याण डोंबिवली- 1052 (मृत्यू18)
उल्हासनगर मनपा - 214 (मृत्यू 6)
भिवंडी, निजामपूर - 100 (मृत्यू 3)
मिरा-भाईंदर- 563 (मृत्यू 10)
पालघर- 126 (मृत्यू 3 )
वसई- विरार- 645 (मृत्यू 16)
रायगड- 502 (मृत्यू 12)
पनवेल- 394 (मृत्यू 13)
नाशिक - 128
नाशिक मनपा- 162 (मृत्यू 5)
मालेगाव मनपा - 722 (मृत्यू 47)
अहमदनगर- 67 (मृत्यू 6)
अहमदनगर मनपा - 20
धुळे - 29 (मृत्यू 3)
धुळे मनपा - 100 (मृत्यू 6)
जळगाव- 345 (मृत्यू 46)
जळगाव मनपा- 140 (मृत्यू 5)
नंदुरबार - 32 (मृत्यू 3)
पुणे- 410 (मृत्यू 8)
पुणे मनपा- 5830 (मृत्यू 276)
पिंपरी-चिंचवड मनपा- 374 (मृत्यू 7)
सातारा- 395 (मृत्यू 7)
सोलापूर- 27 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 652 (मृत्यू 50)
कोल्हापूर- 318 (मृत्यू 1)
कोल्हापूर मनपा- 28
सांगली- 83
सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 11 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 19
रत्नागिरी- 192 (मृत्यू 5)
औरंगाबाद - 26 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा - 1309 (मृत्यू 56)
जालना- 79
हिंगोली- 133
परभणी- 19 (मृत्यू 1)
परभणी मनपा-6
लातूर -85 (मृत्यू 3)
लातूर मनपा- 9
उस्मानाबाद-45
बीड - 40
नांदेड - 19
नांदेड मनपा - 86 (मृत्यू 5)
अकोला - 39 (मृत्यू 5)
अकोला मनपा- 448 (मृत्यू 18)
अमरावती- 16 (मृत्यू 2)
अमरावती मनपा- 178 (मृत्यू 12)
यवतमाळ- 115
बुलढाणा - 53 (मृत्यू 3)
वाशिम - 8
नागपूर- 9
नागपूर मनपा - 475 (मृत्यू 9)
वर्धा - 10 (मृत्यू 1)
भंडारा - 19
चंद्रपूर -9
चंद्रपूर मनपा - 16
गोंदिया - 48
गडचिरोली- 26
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2684 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 17,119 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 68.06 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
Corona 100 Updates | कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स एका क्लिकवर