अहमदनगर : कोरोनाच्या काळात कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकारणी अहमदनगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर मधील विळद घाट येथे असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये असलेल्या क्रस्ना डायगनोस्टिक लॅबमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी MIDC पोलिस ठाण्यात लॅबचे प्रभारी अधिकारी आणि लॅब टेक्निशियन विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


यावर्षी देशात नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोनाचे महाभयंकर संकट आले. अनेक रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला. मात्र अहमदनगर जिल्ह्यात चक्क कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट खोटा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अहमदनगर मधील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये असलेल्या क्रस्ना डायगनोस्टिक लॅबमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. नगरमधील बांधकाम व्यावसायिक अशोक खोकराळे यांच्या वडिलांचा अहवाल बनावट दिल्याने त्यांनी MIDC पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


अशोक खोकराळे यांचे वडील बबन खोकराळे यांना घशात खवखव होत असल्याने त्यांना नगर मधील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना कोरोना झाल्याचे सांगून त्यांना कोरोनाचे उपचार दिले मात्र त्यांचा मृत्यू झाला. मात्र अशोक खोकराळे यांना शंका आल्याने त्यांनी चौकशी केली तेव्हा हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलाय.


या लॅब मधून दिलेले कोरोना अहवालात योगेश उन्हाळे यांचा कोरोना अहवाल आणि अशोक खोकराळे यांच्या वडिलांचा अहवाल एक सारखाच. दोन्ही अहवालात एकच UID नंबर असल्याने बनावट अहवाल दिल्याचे उघड झाले. त्यामुळे अशोक खोकराळे यांनी थेट MIDC पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून क्रस्ना डायगनोस्टिक लॅब चे प्रभारी अधिकारी आणि लॅब टेक्निशियन विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केलाय.


दरम्यान या संदर्भात क्रस्ना डायगनोस्टिक लॅब आणि विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. लॅबमध्ये काम करत असलेल्या 2 हंगामी कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केला असून त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली असून कारवाई करणार असल्याचे सांगितले.


एकीकडे कोरोनाच्या काळात चांगले काम केल्यामुळे डॉक्टर, नर्स यांचे कोरोनयोद्धे म्हणून गौरव केला जातोय. मात्र दुसरीकडे आशा प्रकारे बनावट कोरोना पॉझिटीव्ह अहवाल दिल्याचे समोर आल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.


Cyber Crime : कोरोना लसीच्या नावाखाली ऑनलाईन गंडा, रॅकेट कार्यरत, सावध राहा!