मुंबई : राज्यात आज एका दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज दिवसभरात 19 हजार 218 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 13 हजार 289 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 625773 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 21 हजार 0978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.51% झाले आहे.


राज्यात कोरोना संसर्ग आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज 19 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली. परिणामी राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 लाख 63 हजार 62 झाली आहे. तर आज 378 कोरोना बाधित रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 25 हजार 964 इतकी झाली आहे.


अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु: कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय


कोरोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव
कोरोना विषाणूचा संसर्ग सुरुवातीला शहरी भागात मोठ्या प्रमाणात होता. त्यातही मुंबई आणि उपनगरात तर कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. महापालिका आणि प्रशासनाने चांगलं काम केल्याने शहरी भागात कोरोना संसर्गावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मुंबई शहरात तर हे यश मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आता कोरोना विषाणूचा संसर्ग ग्रामीण भागात वाढताना निदर्शनास येत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बारामती आणि कागल जनात कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. कागलमध्ये 10 दिवस तर 14 दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.


Shivsena on #KanganaRanaut कंगनाविरोधात राज्यभरात संतापाची लाट, शिवसैनिकांचं 'जोडे मारो' आंदोलन