मुंबई : राज्यात आज 3307 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.68 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1315 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 59 हजार 166 झाली आहे. सध्या राज्यात 51 हजार 921 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


राज्यात 114 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5651 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 77, मीरा भाईंदर 1, जळगाव 7, नंदूरबार 2, मालेगाव 2, पुणे 3, पुणे मनपा 18, पिंपरी चिंचवड 1, लातूर 2, यवतमाळमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.


आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 88 पुरुष तर 26 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 114 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 76 रुग्ण आहेत. तर 30 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 8 जण 40 वर्षांखालील आहे. या 114 रुग्णांपैकी 84 जणांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 5651 झाली आहे.


राज्यात सध्या 55 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 98 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 7 लाख 954 नमुन्यांपैकी 1 लाख 16 हजार 752 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 82 हजार 699 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1555 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 80 हजार 545 खाटा उपलब्ध असून सध्या 27 हजार 582 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


Uddhav Thackeray | आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे : मुख्यमंत्री