मुंबई : राज्यात आज 5 हजार 368 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 11 हजार 987 इतकी झाली आहे. आज 3 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 15 हजार 262 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 87 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 204 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 35 हजार 447 नमुन्यांपैकी 2 लाख 11 हजार 987 (18.67 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 265 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 46 हजार 355 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 3 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.37 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 262 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 204 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे.


मुंबईने चीनला टाकलं मागे


मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा वाढणारी संख्या जास्त चिंता वाढवणारी आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईने चीनलाही मागे टाकलं आहे. चीनमध्ये 85 हजार 320 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 85 हजार 724 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.


इतर बातम्या




Devendra Fadnavis Thane | टेस्टिंगची क्षमता राज्यात जास्त, त्याचा वापर झाला पाहिजे - देवेंद्र फडणवीस