मुंबई : राज्यात आज 5 हजार 134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 17 हजार 121 इतकी झाली आहे. आज 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 89 हजार 294 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 224 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 (18.69 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 985 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 463 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.6 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 18 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 224 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के एवढा आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या





Vaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती