बेळगाव : राज्य सरकारकडून झोननिहाय नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दारू दुकानांसह अन्य दुकाने सोमवारपासुन सुरू झाली असून सकाळपासून दारुच्या दुकांनासमोर मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी पाहायला मिळाली. बेळगावात तर चक्क पहिल्या ग्राहकाचे दुकान मालकांनी हार घालून स्वागत केले.


बेळगावमध्ये सोमवारी (4 मे) सकाळी दुकान उघडल्यावर पहिल्या ग्राहकाचे ग्राहक देवो भव म्हणून हार घालून स्वागत करून शुभारंभ केला. मध्यरात्रीपासून तळीरामांनानी दुकानासमोर आपला नंबर लावून ठेवला होता. सोशल डिस्टनसिंग साठी आखून देण्यात आलेल्या चौकोनात अनेकांनी आपल्या पिशव्या ठेवून नंबर लावून आपण बाजूला थांबले होते. दुकानाचा दरवाजा उघडायच्या वेळेला मात्र तळीराम आपली पिशवी ठेवलेल्या जागेवर जाऊन उभे राहिले. यापूर्वी रेशन दुकानासमोर ग्राहक आपली पिशवी चौकोनात ठेवून उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीत उभे राहिल्याचे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले. मात्र पहिल्यांदा सकाळी दारू खरेदी करण्यासाठी मध्यरात्रीपासून नंबर लावला होता.


गृह मंत्रालयाने शुक्रवारी लॉकडाऊन 17 मेपर्यंत दोन आठवडयांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील अनेक निर्बंध उठवले. तसेच तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार  आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.


संबंधित बातम्या :



सांगली जिल्ह्यात दारू दुकानांसह इतर गोष्टींना सशर्त परवानगी