जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मृग बहाराची मोसंबी विक्रीसाठी आणली खरी मात्र कोसळले भाव पाहून शेतकऱ्यांचे मात्र हात पाय गळाले. सध्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनापासून मोसंबी देखील सुटली नाही. कोरोनाच्या प्रादूर्भावाने मोसंबीचा भाव कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटलवर आला आहे. सध्याच्या काळात या बहाराला मार्केट मध्ये मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे ही मोसंबी बेभाव विकत आहे. मोठ्या आशेने रानातून बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मात्र उत्पन्न खर्च सुद्धा निघत नसल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

जालन्याच्या मोसंबीला दिल्ली ,जयपूर, हरियाणासह उत्तरेकडील इतर अनेक राज्यात मोठी मागणी आहे. मात्र कोरोनाचा प्रभावाने स्थानिक मार्केटमध्ये उत्साह नसल्याने तेथील मोठ्या व्यापाऱ्यांनी जालन्याच्या मोसंबीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी स्थानिक बाजार पेठेच्या भरवशावर येथील खरेदीदारांची संख्या रोडावली परिणामी व्यपाऱ्यांकडून देखील पाडून भाव मागितले जातात.

सध्या स्थितीत जालना मार्केट कमिटीमध्ये अडीचशे ते तीनशे क्विंटल मोसंबी ची आवक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा स्थितीला कोरोनाचा प्रभाव कारणीभूत असून सध्या शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळणे अशक्य असले तरी भविष्यात भाव वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

मागील चार महिन्यापूर्वी मोसंबीच्या आंबिया बहराला 4500 रूपये क्विंटल एवढा उच्च भाव मिळावा होता. त्या आशेवर शेतकऱ्यांनी मृग बहराचे विशेष व्यापवस्थापन खर्च करून ही मोसंबी बाजारात आणली मात्र कोरोनाने शेतकऱ्यांच्या चांगल्या भावाच्या अपेक्षेवर पाणी फिरवल. अर्थात यामध्ये त्यांना जबर आर्थिक नुकसान सहन कराव लागतं आहे.

coronavirus | गोरेगाव फिल्मसिटीतलं शूटिंग बंद, मुख्यद्वारासमोर पोलिसांचा बंदोबस्त



संबंधित बातम्या :

सॅनिटायझर, मास्क चढ्या दराने विकल्यास कडक कारवाई करणार, अन्न-औषध प्रशासनाचा इशारा

Coronavirus | दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये तर हॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात

Coronavirus | सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळ्याचा भाव 40 हजारांच्या खाली