Corona Cases Today : देशातील कोरोना संकट अद्याप टळलेलं नाही. दरदिवशी जवळपास 50 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, 27 जूनपासून सलग 50 हजारांहून कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 44,111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 738 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 57,477 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 5 लाख 2 हजार 362
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 96 लाख 5 हजार 779
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 95 हजार 533
एकूण मृत्यू : 4 लाख 1 हजार 50
देशात सलग 51व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 2 जुलैपर्यंत देशभरात 34 कोटी 50 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 50 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41.64 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल्स तपासण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.
राज्यात शुक्रवारी 8,385 रुग्णांना डिस्चार्ज तर 8,753 नवीन रुग्ण, 'या' जिल्ह्यात एकही रुग्ण नाही
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल (शुक्रवारी) 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 16 हजारांच्या जवळ आल्या आहेत. विशेष म्हणजे काल मालेगाव आणि नंदुरबारमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर आज राज्यातील 34 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
राज्यात गुरुवारी 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 8,634 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आजपर्यंत 58,36,920 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,16,867 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई काल (शुक्रवारी) 676 रुग्णांची नोंद, तर 27 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 676 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,97,140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,598 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 744 दिवसांवर गेला आहे.
कोविड परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी किती दिवस लागतील?
जगभरात कोविड लशीचे 301 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. सर्व व्यवहार कधीपर्यंत सुरळीत होतील याचं अमेरिकेपुरतं उत्तर अँथनी फाऊची यांच्या सारख्या तज्ञांनी दिलं आहे, त्यांच्यामते जोवर 70 ते 85 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण होत नाही तोवर परिस्थिती निवळणार नाही.
अमेरिकेत आत्तापर्यंत साडे 32 कोटी डोस दिले गेले आहेत (त्यातील साधारण 16 कोटी लोकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत). सध्या दररोज सरासरी 10 लाख लोकांना लस दिली जाते याच गतीने 75 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी किमान पाच महिने लागतील तर युरोपला दोन महिने लागतील असं ब्लुमबर्गच्या एका अहवालात म्हंटलं आहे. भारतात सध्या 34 कोटी 76 हजार 232 डोस दिले गेले आहेत. सध्या दररोज साधारण 40 लाख लोकांना लस दिली जाते, या गतीने भारतातील 75 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल असा अंदाज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Vaccination for Pregnant Women: आता गरोदर महिलाही लस घेऊ शकणार, NTAGI शिफारशीनंतर आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
- Johnson & Johnson Covid Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचा सिंगल डोस भारताला मिळण्याची शक्यता, 'हा' आहे केंद्र सरकारचा प्लॅन
- Covid 19 : कोविड परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी किती दिवस लागतील?