मुंबई : जगात सर्वाधिक वेगानं कोरोनाचं संक्रमण भारतात वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. तब्बल 96 हजार 551 ने कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तर मृतांचा आकडा देखील 1 हजार 209 ने वाढला आहे. सलग दहाव्या दिवशी देशात कोरोनाचे 1 हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत.


राजेश टोपेंनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 9,89,934 वर गेला आहे. यातले 7 लाख 715 बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 261432 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर राज्यात 27,787 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. हा एकूण आकडा लक्षात घेतला तर महाराष्ट्र राज्य कोरोनाबाधितांच्या संख्येत पाचव्या स्थानी आलं आहे.


वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आजच्या सकाळपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 6,588,163 इतकी होती तर मृतांची संख्या 196,328 हजार इतकी वाढली. भारतात आतापर्यंत 4,562,414 लोक कोरोना बाधित झाले असून 76,304 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये बाधितांची संख्या ही 4,239,763 गेली असून 129,575 लोकांचा मृत्यू झाला आहे. चौथ्या स्थानी 1,046,370 रुग्णसंख्येसह रशियाचं नाव आहे.


मे महिन्यापर्यंत भारतात 64 लाख लोकांना कोरोनाची बाधा; ICMR च्या सीरो सर्व्हेमध्ये धक्कादायक खुलासा


देशात गेल्या 24 तासात 70 हजार 880 रुग्ण बरे झाले आहेत तर 24 हजार 462 लोकांना कोरोनाची लागण झाली. देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 45 लाख 62 हजार 414 इतका आहे. त्यापैकी एकूण 35 लाख 42 हजार 663 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 77.74 टक्के इतका आहे. काल 10 सप्टेंबरपर्यंत देशात 5 कोटी 40 लाख 97 हजार 975 कोविड चाचण्या झाल्या आहेत. काल देशात 11 लाख 63 हजार 542 कोविड चाचण्या झाल्या.


आजघडीला जगात अमेरिका, भारत आणि ब्राझील या देशांत कोरोना व्हायरसचा मोठा हाहाकार उडाला आहे. या देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याची चिन्हं अजून तरी दिसत नाहीत. भारतात कोरोना रुग्ण संख्या आणि मृतांच्या संख्येत विक्रमी वाढ झालीय. जगातील कोरोनाची 54 टक्के केसेस ( 1.52 कोटी) या  केवळ अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांत आहेत. तसेच कोरोनाच्या एकूण मृतांपैकी 44 टक्के मृत्यूही ( 3.99 लाख ) या तीन देशांमधीलच आहेत. सोबतच 54 टक्के ( 1 कोटींहून अधिक) लोक कोरोनामुक्त झालेत.