पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नागरिकांना कोरोनासोबत भूकंपाच्या सावटाखाली जगावं लागत आहे. या परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.


रात्रभरात सहा भूकंपाचे धक्के
रात्री 3 वाजून 29 मिनिटांनी 3.5 रीश्टर स्केल, 3 वाजून 43 मिनिटांनी 2.8 रीश्टर स्केल, 3 वाजून 45 मिनिटांनी 2.6 रीश्टर स्केल, 3 वाजून 57 मिनिटांनी 3.5 रीश्टर स्केल, 5 वाजून 4 मिनिटांनी 2.2 रीश्टर स्केल, 6 वाजता 4.2 रीश्टर स्केल,7 वाजून 6 मिनिटांनी 4.2 रीश्टर स्केल अशा तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत.


काल रात्री आणि आज पहाटे पुन्हा सहा भूकंपाचे धक्के बसले आहेत. मध्यरात्री जवळपास सौम्य व मध्यम स्वरूपाचे पाच धक्के बसल्याची नागरिकांनी माहिती दिलीय. तलासरी, धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, कासा, बोर्डी, दापचरी, धानिवरी, आंबोली, चिंचणी आणि आजूबाजूचा परिसर भूकंपानं हादरला आहे.


या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा सुरू झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांच्या सत्रांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात 7 तारखेला डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचा धक्का बसला होता.


सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम


नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018
11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल
24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल,
1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल
4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल
7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल
10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल


2019
20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल
24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल
1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल
7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल
13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल
20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल
1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल
9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल
10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल
31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल
2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल
9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल
15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल
12 मे - 2.6 रिश्टर स्केल
10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल
20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल
24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल
25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल
31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल
13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल
21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल
20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल
21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल
2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल
24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल
26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल
18 नोव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल
21 नोव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल
13 डिसेंबर- दुपारी 4 वाजून 8 मिनिटांपासून सलग 2.8, 3.1, 2.9 असे सलग 3 धक्के बसले, रात्री 9.21 वाजता 3.7 रिश्टर स्केल
14 डिसेंबर पहाटे - 5.22 वाजता 3.8 रिश्टर स्केल


2020
31 जानेवारी 2020 - 3.3 रिश्टर स्केल
19.मार्च 2020 - 3.3 रिश्टर स्केल
1 एप्रिल 2020 - 3.0 रिश्टर स्केल
6 एप्रिल2020 - रात्री 12.18 वाजता 3 .1 रिश्टर स्केल
17 जून 2020 - सकाळी 11.51 वाजता 2.5 रिश्टर स्केल
4 सप्टेंबर 2020 - 10 वाजून 33 मिनिटं 2.8 रिश्टर स्केल, 11 वाजून 41 मिनिटं 4.0 रिश्टर स्केल, 12 वाजून 05 मिनिटं 3.6 रिश्टर स्केल