नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारता सध्या 45 लाख 50 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर देशात आतापर्यंत 76 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता एक आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली आहे. ICMR ने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच 64 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याची माहिती या सर्व्हेमधून समोर आली आहे.


मे महिन्यापर्यंत 64 लाख लोकांना कोरोनाची लागण


ICMR तर्फे काही दिवसांपूर्वी नॅशनल सीरोलॉजिकल सर्व्हे करण्यात आला होता. त्याचे निष्कर्ष आता समोर आले आहेत. यामधून एक आश्चर्यचकीत करणारा खुलासा करण्यात आला आहे. सर्व्हेनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 64 लाख (64,68,388) लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याची आकडेवारी टक्केवारीमध्ये पाहायची झाली तर 0.73 टक्के लोकं कोरोनाग्रस्त असल्याचं या सर्व्हेमधून निष्पन्न झालं आहे. परंतु, या सर्व लोकांची कोरोना चाचणीच झाली नव्हती. म्हणजेच, या लोकांना आपल्याला कोरोना झाल्याचं समजलंच नाही.


सीरो सर्व्हेनुसार, आरटी-पीसीआर टेस्टमार्फत एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न होत होतं. तर मे महिन्या दरम्यान, 82 ते 130 कोरोना बाधितांचे रुग्ण समोर येत होते.


लॉकडाऊन दरम्यानचे हे आकडे


सीरो सर्व्हेनुसार, ज्या ठिकाणी कोरोना संसर्गाची प्रकरणं समोर आली नाहीत. कारण त्यावेळी त्यांच्या परिसरात टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तिथे कोरोनाच्या चाचणी मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत. तसेच हा सर्व्हे देशातील लॉकडाऊन दरम्यान करण्यात आला होता.


केव्हा करण्यात आला सर्व्हे


ICMR चा हा सर्व्हे 11 मेपासून 4 जूनदरम्यान करण्यात आला आणि 28,000 लोकांना यामध्ये सहभागी करण्यात आलं होतं. या सर्व्हेमध्ये 18 वर्षांवरील लोकांचे मोठ्या प्रमाणावर सॅम्पल्स घेण्यात आले होते. सर्व्हेचा सॅम्पल साइज 28,000 होता.


कोणत्या राज्यात करण्यात आला सर्व्हे


देशातील 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्ये जाऊन 700 गावांत वॉर्डमध्ये हा नॅशनल सीरोलॉजिकल सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये 181 म्हणजेच, 25.9 टक्के शहरी विभाग होते.


वयोगटानुसार सीरो सर्व्हेचा निकाल


18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये 43.3 लोक पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. तर 46-60 वयोगटातील ग्रुपमध्ये 39.5 टक्के लोक पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. वयवर्षे 60 वर्षांवरील लोकांमध्ये 17.2 लोक पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं.


महत्त्वाच्या बातम्या :


येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी


Corona Update | बंगळुरु येथील 27 वर्षीय महिलेला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण