जालना : जालना जिल्ह्यातील मंठा शहरात आज बारावीच्या परीक्षादरम्यान परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. आज मराठी भाषा विषयाचा पेपर होता. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर बाहेरून सर्रासपणे कॉप्या पुरवतानाचे दृश्य पाहायला मिळाले.


जालना जिल्ह्यातील मंठा येते तीन परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा चालु आहे. या तिन्ही परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट सुरु आहे. शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या केंद्रावर बाहेरून विद्यार्थी बिनधास्तपणे आतमध्ये कॉप्या पुरवत आहेत. आज मराठी विषयाच्या पेपरला ही स्थिती होती.

परीक्षा केंद्रात पेपर सुरु असतान एका व्यक्तीने आत प्रवेश करून मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटो काढण्याचाही प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान दोन दिवस झाले आहे भरारी पथक या केंद्रांवर फिरकले नसल्याने या कॉपी बहाद्दरांनी या परीक्षा केंद्रावर उच्छाद मांडला आहे.



बारावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. आज तिसरा पेपर होता. या दरम्यान अशी स्थिती पाहायला मिळाली. आज नांदेड जिल्ह्यातही बारावी परीक्षेच्या केंद्राबाहेर शंभर रुपयात उत्तराची विक्री सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली. कंधार तालुक्यातील पानभोसीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय पानभोसी इथल्या परीक्षा केंद्रावरील हा प्रकार होता. 100 रुपयांना एका उत्तराची विक्री सुरु होती. तर परीक्षार्थीपर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये आकारले जात होते. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांसमोर परीक्षा केंद्रांवर हा प्रकार सुरु होता.

संबंधित बातम्या


100 रुपयात उत्तर, विद्यार्थ्यापर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये, नांदेडमध्ये बारावी परीक्षेदरम्यान प्रकार