अहमदनगर: अहमदनगर शहरात वाढदिवस साजरा करण्यावरुन काल रात्री दोन गटात तूफान राडा झाला. तलवारीसह मारहाण करुन दोन्ही गटात भीषण दगडफेक झाली. या राड्यात एक जण जखमी असून, 9 दुचाकी आणि अॅम्ब्युलन्सह कारचं नुकसान झालं आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तोफखाना परीसरात कॉँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. मात्र वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करुन तलवारीसह मारहाण केली. या मारहाणीत प्रताप जाधव हे जखमी झाल्याची फिर्याद चैतन्य जाधव यांनी दिली.
त्याचबरोबर जाधव यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर विरोधी गटानं दुचाकीसह अॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी विरोधी गटानंही परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. दरम्यान या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.