Washim News वाशिम: कोट्यवधींच्या संपत्तीने चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. केवळ पूजा खेडकरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचे देखील अनेक कारनामे आणि अरेरावी संदर्भातील प्रकार समोर आलं आहे. खासगी गाडीवर लाल दिव्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर कब्जापर्यंत आणि जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. त्यांच्या या कारनाम्यांची चर्चा सध्या पुण्यातील गल्ल्यांपासून देश पातळीवर होत आहे.
अशातच पूजा खेडकर प्रकरणी आता एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. जर या समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळून आल्या तर पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. अशातच आता पूजा खेडकर प्रकरणी सादर केलेले दस्तावेजांची तपासणी या समिती मार्फत केली जाणार आहे.
प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकार्यांवरही कारवाईची टांगती तलवार
पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रात नॉनक्रिमिलेअर आणि मेडिकल दृष्टी दोष रिपोर्टची चाचणी प्रमाणपत्र कुणी दिलं? ज्या रहवासी भागातून हे प्रमाणपत्र देण्यात आली त्यांची देखील या प्रकणी चौकशी होऊन त्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत सोमवारी किंवा त्यानंतर चौकशी होऊन या बाबत कारवाई केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आता पुन्हा नव्याने वाढ होणार असल्याची शक्यता आहे. पूजा खेडकर प्रकरणातील सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी आता तपास समितीमार्फत होणार आहे. नॉन क्रिमिनल आणि मेडिकल दृष्टी दोष चाचणी कोणी केली होती, ज्या रहिवासी भागातून जे प्रमाणपत्र देण्यात आलं त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवार किंवा त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाऊ शकते.
दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई
पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी सदस्य समिती नेमली असून त्या प्रकरणाची सखोल चौकशी ही समिती सध्या करत आहेत. पूजा खेडकर यांनी सादर केलेले प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची तपासणी ज्यामध्ये मेडिकल दृष्टीदोष चाचणी रिपोर्ट आणि नॉन क्रिमिनल इत्यादी कागदपत्रे ज्या भागातून देण्यात आले आहे त्या त्या संबंधित विभागाची चौकशी केली जाणार आहे. मात्र आज शनिवार आणि उद्या रविवार आल्याने ही कारवाई सोमवार किंवा मंगळवारी केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या कारवाईत काही दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या