#ISupportRahulKulkarni | राहुल कुलकर्णी यांची अटक चुकीची, मीडियातील दिग्गजांसह अनेकजण समर्थनार्थ
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन हा तीन मे पर्यंत वाढला असल्याने या वर्षात या एमपीएससी ,यूपीएससी स्पर्धा परीक्षा नेमक्या कधी घ्यायच्या ? हा प्रश्न आहे. यामध्ये या वर्षभरात जर स्पर्धा परीक्षा घेता आल्या नाहीत तर या परीक्षेसाठी पात्र असलेले हजारो विद्यार्थी वयोमर्यादेबाहेर जातील व त्यांना परीक्षा पुन्हा देता येणार नाही. त्यामुळे वयोमर्यादेत असलेल्या विद्यार्थ्यांचा हे वर्ष वाया वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत यावर्षीसाठी 1 वर्ष वाढवून देणं शक्य होईल का ? या निर्णयाबाबत विचार सुरू आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढतेय
देशातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार, देशातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा 12380 पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे 414 लोकांनी जीव गमावला आहे. देशात 10477 लोकांवर उपचार सुरू असून त्यातील 1488 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत 414 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकूण 392 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 187 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये 53, दिल्लीमध्ये 32 आणि गुजरातमध्ये 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 2916 पार पोहोचली आहे. तर 187 लोकांचा मृत्यू झाली आहे. याव्यतिरिक्त 295 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये एकूण 1578 रूग्ण समोर आले आहेत. तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 लोक ठिक झाले आहेत.
Bandra railway station incident | वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणावर 'एबीपी माझा'ची भूमिका | ABP Majha