Vijay Wadettiwar नागपूर : गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्रातील प्रत्येक घरा-घरात आणि मंडळात आज होत आहे. असे असताना महाराष्ट्रावर अरिष्ट आले आहे, बेरोजगार, महिला अत्याचार, गुन्हेगारी या सर्व गोष्टी दूर कर आणि महाराष्ट्राला पुन्हा सुगीचे आनंदाचे आणि मानवतेचे दिवस येऊ दे, अशी बापाच्या चरणी प्रार्थना करतो. असे म्हणत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
या विघ्नहर्त्याला हात जोडून महाराष्ट्रातील लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्याची सद्बुद्धी दे. मराठवड्यातील शेतकरी रडतोय, शासनाला सद्बुद्धी दे आणि शेतकऱ्यांना मदत लवकर मिळावी अशी प्रार्थनाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सोबतच त्यांनी राज्यातील सर्व बांधवाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. ते नागपूर येथे बोलत होते.
बाप्पाचे आगमन आज होत आहे. मात्र 2 महिन्यांनी महाराष्ट्रवरचे संकट दूर होईल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केलाय. महाभारतात उदाहरण देऊन कलियुगातील ते अभिमन्यु आहे, जो सतयुगात सुटला नाही तर आधुनिक युगात कसा सुटेल. आधुनिक युगात अभिमन्यू तयार होतच नाही. अभिमन्यूला रिमोट ची गरज नसते, त्या अभिमन्यूला त्यांचाच पक्षातील रिमोट कंट्रोल करतोय, अशी अप्रत्यक्ष टीका ही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
अभिमन्यूला त्यांचाच पक्षातील रिमोट कंट्रोल करताय
महाभारतात उदाहरण देऊन कलियुगातील ते अभिमन्यु आहे, जो सतयुगात सुटला नाही तर आधुनिक युगात कसा सुटेल. आधुनिक युगात अभिमन्यू तयार होतच नाही. अभिमन्यूला रिमोट ची गरज नसते, त्या अभिमन्यूला त्यांचाच पक्षातील रिमोट कंट्रोल करतोय, अशी अप्रत्यक्ष टीका ही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.संजय गायकवाड हे 120 जागा लढून 300 जागा देखील आणू शकतात. पैशाच्या भरवश्यावर आम्ही जिंकून आणू शकतो.असा विश्वास त्यांना आहे म्हणून ते तसे बोलत असल्याचेही म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना शिंदे गाटाचे आमदार संजय गायकवाड यांना टोला लगावला आहे.
गडचिरोली सारख्या दुर्गम भागात गडचिरोली विद्यापीठ स्थापन करा
नाशिक येथे स्थापन करण्यात येणाऱ्या आदिवासी विद्यापीठ बाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात येत आहे. आदिवासी विद्यापीठ नागपूर किंवा गडचिरोलीला स्थापन करण्याऐवजी नाशिकला स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नागपूर विभागात हे विद्यापीठ केले असते तर गडचिरोली सारख्या दुर्गम भागात असलेल्या आदिवासींना त्याचा फायदा होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मागणी आहे आदिवासीसाठी स्वतंत्र विद्यापीठ गडचिरोलीला व्हावे. मात्र त्यामागे नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे ही वाचा