Eknath Shinde : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. राज्यातील महायुतीचा कॅप्टन मीच असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on Mahayuti) यांनी म्हटले आहे. दैनिक सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजनासंह, रोजगार, विरोधकांकडून होणारे आरोप, दिल्लीमध्ये भाजप श्रेष्ठींकडून मिळत असलेल्या पाठिंब्याच्या मुद्यावर भाष्य केले. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांचा तुम्हाला खूप जास्त पाठिंबा असल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी उत्तर दिले. 


आम्ही सगळे दिवस रात्र काम करत आहोत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी काम करत आहे ते कामाला महत्त्व देत आहेत. आज आम्ही सगळे काम करत आहोत. मी असो, देवेंद्रजी काय अजितदादा काय आम्ही सगळे दिवस रात्र काम करत आहोत. देशाचे पंतप्रधान किती मेहनत करत आहेत. दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान कधी आपण पाहिला का? आपली अर्थव्यवस्था अकरव्या नंबरवरून पाचव्या स्थानी आली. आता तिसऱ्या स्थानावर आणणार आहेत. अमित शाह यांनी सहकार क्षेत्रामध्ये 10 हजार कोटींची कर्जमाफी दिली कारण साखर उद्योग अडचणीत आला होता. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. त्यात कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. 


अजितदादांच्या वादावर काय म्हणाले? 


अजितदादा आणि तुमच्यामध्ये जमत नाही, असं बोललं जातं त्याबद्दल काय सांगाल? असे विचारले असता भांड्याला भांडे लागते. भावंडा भावंडांमध्ये पण थोडे मतभेद असतात, म्हणजे वाद नाही. मतभेद असावेत, मनभेद नसावेत. मतभेद म्हणजे काहीतरी काही गोष्टींवर चर्चा होते असे मुख्यमंत्री म्हणाले. फायद्या तोट्यासाठी आम्ही कधी काम केलेलं नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठले निर्णय आम्ही घेतले नाहीत. ते सोबत आल्याने आम्ही काम करत आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर काय म्हणाले?


आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. आमचं टीमवर्क आहे. राज्याचा विकास करणे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणे हे आमचं काम आहे. या कामाची पोच पावती लोक देतील. राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आणण्याचा आमचा उद्देश आहे. बाळासाहेब असताना दिल्लीचे नेते इकडं येते होते. आता काय स्थिती आहे अशी विचारणा शिंदे यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या