जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. पंचायत समिती सभापतीपदासाठी राज्यात अनेक ठिकाणी अभद्र युती पाहायला मिळाली. तेच चित्र जिल्हा परिषदेतही दिसत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत 22 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. पण शिवसेनेने भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्षपद देण्याच्या अटीवर काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेची 62 एवढी सदस्य संख्या असून 32 ही मॅजिक फिगर आहे. शिवसेनेला 18 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्यात. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेची सदस्यसंख्या मिळून 34 झाली आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद -एकूण जागा (62)
- शिवसेना – 18
- भाजप – 22
- काँग्रेस – 16
- राष्ट्रवादी – 3
- मनसे – 1
- अपक्ष (भाजप पुरस्कृत) – 1
- अपक्ष – 1