Congress protest Live : सोनिया गांधींची ईडी चौकशी; काँग्रेस आक्रमक, पाहा ठिकठिकाणचे अपडेट्स

Congress protest Live : सोनिया गांधी आज ईडी समोर हजर होणार आहेत. ईडीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. पाहा ठिकठिकाणचे अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jul 2022 02:40 PM
अमरावती : अमरावतीत काँग्रेसचा मोर्चा, सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर

अमरावती : अमरावतीत काँग्रेसचा मोर्चा, सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे. त्यामुळे देशभरात काँग्रेस आक्रमक झाली असून अमरावती काँग्रेसचे वतीने आणि माजीमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला... केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून दडपशाही करत असल्याचा आरोप करण्यात आला. अमरावतीच्या इर्विन चौकात    काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात  जोरदार अशा घोषणाबाजी देण्यात आल्या, मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात हा मोर्चा असून आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतोय अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली..

नाना पटोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

नाना पटोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

नाना पटोलेंसह नेत्यांचा पावसात खाली बसून निषेध, , झिशान सिद्दीकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कार्यकर्ते गाडी समोर, पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाजूला केलं

नाना पटोलेंसह नेत्यांचा पावसात खाली बसून निषेध,  , झिशान सिद्दीकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कार्यकर्ते गाडी समोर, पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाजूला केलं 

Pune News : सोनिया गांधीना ED ची नोटीस, काँग्रेसच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन 

Pune News : नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीनं (ED) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे, पुण्यात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. सरकार केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार सतेज पाटील, प्रणिती शिंदे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. काही वेळा तच पृथ्वीराज चव्हाण देखील पोहोचणार आहेत.

सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल, चौकशीला ईडीकडून सुरुवात

सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल, चौकशीला ईडीकडून सुरुवात





Mumbai Congress : मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, भाई जगताप आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

Mumbai Congress : मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक,  भाई जगताप आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

सीएसएमटी परिसरात काँग्रेस आंदोलक जमले , काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु

सीएसएमटी परिसरात काही काँग्रेस आंदोलक जमले , काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु

पार्श्वभूमी

ED Summons Sonia Gandhi : नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीनं (ED) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी आज ईडी समोर हजर होणार आहेत. तर ईडी विरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाणार आहे. केंद्र सरकार विरोधात आज काँग्रेसचे नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या मोर्चात नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जाणार आहेत. 


यापूर्वी जूनमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडी चौकशी झाली होती. त्यावेळीही ईडीविरोधात काँग्रेसनं देशभरात एल्गार पुकारला होता. यावेळी काँग्रेसनं दिल्लीत जबरदस्त निदर्शनं करत मोदी सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला होता आणि गांधी कुटुंबावरील मनी लाँड्रिंगचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. गुरुवारी, काँग्रेस खासदार संसदेच्या आत आणि बाहेर आंदोलन करतील, तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते अकबर रोडवरील मुख्यालयात जमतील आणि ईडी कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करतील. 


सोनिया गांधींना ईडीचं समन्स 


यापूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. पण राहुल गांधी मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. राहुल गांधींची 5 दिवसांत जवळपास 50 तासांसाठी चौकशी करण्यात आली होती. तेव्हा कांग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सलग 5 दिवस ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. आज सोनिया गांधींची ईडी चौकशी होणार असून पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक होणार आहे. 


नॅशनल हेराल्ड म्हणजे काय?


नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.