मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधी 70 टक्के मतं आणि कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर झालेली समीकरणं याचा विचार करता महाराष्ट्रात येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसने पहिलं पाऊल टाकलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना यासंदर्भात अहवाल देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, बहुजन विकास आघाडी, सीपीएम, रिपाई (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या निवडणुकीत एक जागा एक उमेदवार हे सूत्र असावं, ज्या जागेवर जो उमेदवार निवडून येईल, तो गुणवत्तेचा निकष धरावा, मतविभाजन टाळावं, अशी चर्चा आज काँग्रेसच्या बैठकीत झाली.
काँग्रेसच्या बैठकीतील मुद्दे
पालघरमध्ये 70% मतदान भाजपविरोधी
कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस ,बसपा एकत्र लढले असते तर 180 जागा काँग्रेसने जिंकल्या असत्या.
हे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टाळावं
लोकसभा 48 उमेदवार आणि विधानसभेसाठी 288 उमेदवार
कोणत्या जागेवर काँग्रेस आणि कोणत्या जागेवर राष्ट्रवादी प्रबळ याबाबत चर्चा
कोणत्याही जागी उभा केलेला उमेदवार निवडून यावा, मतविभाजन टाळावं यासाठी एक मतदार संघ, एक उमेदवार असं सूत्र असावं
उमेदवार निवडून येऊ शकतो हा एकच गुणवतेचा निकष धरण्यात यावा
लोकसभा जागा आणि विधानसभा समतोल साधण्याचा प्रयत्न करावा
राज्यातल्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेसचा महाआघाडीचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2018 05:38 PM (IST)
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, बहुजन विकास आघाडी, सीपीएम, रिपाई (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -