अहमदनगर : अहमदनगरला सीना नदीपात्रातील अतिक्रमण काढताना निजामशाहीन कालीन अवशेष आढळले आहेत. पुरातन दगडी अवशेष आढळले. साधारण नऊ फूट उंच आणि अकरा बाय अकराचा गोलाकार अकराची दगडी वास्तू आहे. मध्यभाग रिकामा असून मातीनं भरलाय. मातीवर काही काटेरी झुडपं वाढली आहेत.
या अवशेषांवरुन पुरातन काळात पाण्याचा दगडी हौद असण्याची शक्यता पुरातत्त्व तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. या हौदासाठी निजामशाहीतील ऐतिहासिक वास्तुंचे दगड वापरण्यात आलाय. येणार्या जाणार्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हा दगडी हौद बांधल्याची शक्यता आहे.
काटवन खंडोबा पुलाजवळ भल्यामोठ्या आकाराची ही प्राचिन दगडी वास्तू आढळली. जेसीबीनं हा दगडी हौद हलवण्याचा प्रयत्न केला माञ तळाचा भाग खोलवर असल्यानं तो कलंडला. मात्र यानंतरही हौदाचा एकही दगड हालला नसल्यानं बांधकाम किती पक्क आहे, याचा प्रत्यय आला.
याबाबत तात्काळ पुरातत्त्व खात्याला माहिती देण्यात आली. उत्खनन केल्यावरच रहस्य समजणार असल्याचं सांगितलंय. ही दगडी वस्तू अवजड असल्यानं जमिनीतून तिला वर काढावं लागणारं आहे. या वस्तूचा खालचा भाग जमिनीत असून बाहेर काढल्यावर माहिती समजणार आहे.
सीना नदीपात्रात गेल्या आठ दिवसापासून अतिक्रण हटाव मोहिम सुरु आहे. नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम सुरु आहे. यावेळी पुरातन अवशेष आढळल्यानं इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
अहमदनगर हे शहर निजामशहानं वसवलं असून निजामशहाची राजधानी होती. शहराला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी ईतिहासाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. त्यामुळे कुठे उत्खनन सुरु झाल्यास ऐतिहासिक वस्तू आढळून येतात.
नगरच्या सीना नदीपात्रात निजामकालीन अवशेष आढळले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2018 03:38 PM (IST)
काटवन खंडोबा पुलाजवळ भल्यामोठ्या आकाराची ही प्राचिन दगडी वास्तू आढळली. जेसीबीनं हा दगडी हौद हलवण्याचा प्रयत्न केला माञ तळाचा भाग खोलवर असल्यानं तो कलंडला. मात्र यानंतरही हौदाचा एकही दगड हालला नसल्यानं बांधकाम किती पक्क आहे, याचा प्रत्यय आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -