मी राजीनामा दिलाच नाही, श्रीपाद छिंदमचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2018 02:55 PM (IST)
छिंदमनं उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी राज्यभरात शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता.
अहमदनगर : अहमदनगर मनपाचा भाजपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या राजीनामानाट्याचा कलगीतुरा चांगलाच रंगलाय. छिंदमने मी राजीनामा दिलाच नसल्याचा दावा केलाय. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनीच माझ्या लेटरहेडचा गैरवापर केला आणि राजकीय षडयंत्रातून माझ्या लेटरपॅडवर बनावट सहीने उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर केल्याचा आरोप छिंदमने केलाय. या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी छिंदमनं केली. भाजप खासदार दिलीप गांधी यांनीच छिंदमचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र छिंदमच्या या दाव्यानं गांधी तोंडघशी पडलेत. या प्रकरणी खासदार गांधी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.