"राणेसाहेबांच्या निर्णयानंतर खूप जणांचे आयुष्य घडणार आणि बिघडणारही आहे. मात्र, राणेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हा कार्यकर्त्यांच्या हिताचा असेल," असं आमदार नितेश राणे म्हणाले होते.
नितेश राणे म्हणाले होते की, "महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे नावाची भीती किती आहे, हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलं आहे. राणेसाहेबांच्या भोवतालीच महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे. साहेब कुठे जाणार? कोणता निर्णय घेणार? याची चिंता आम्हाला सोडून सर्वांनाच आहे. राणेसाहेबांच्या निर्णयानंतर खूप जणांचे आयुष्य घडणार आणि बिघडणारही आहे. मात्र, राणेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हा कार्यकर्त्यांच्या हिताचा असेल."
फडणवीस-शाह भेटीदरम्यान राणे अहमदाबादमध्ये!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी अहमदाबादमध्ये गेले असतानाच नारायण राणेही तिथेच असल्याची दृश्ये 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. देवेंद्र फडणवीस आणि आमित शाह यांच्यात झालेली बैठक ही राणेंच्या संभाव्य भाजपप्रवेशाबद्दलच असल्याची माहिती 'माझा'च्या सूत्रांनी दिली आहे. पण या बैठकीत नारायण राणे सहभागी नव्हते. सुमारे तासभर झालेल्या बैठकीनंतर फडणवीस जेव्हा बाहेर आले, तेव्हा त्यांच्यासोबत नारायण राणे नव्हते.. पण राणे अहमदाबादमध्येच असल्यानं या भैटीला आणखी महत्त्व मिळालं आहे.
दरम्यान आज मुंबईला परत येत असताना एबीपी माझाने नारायण राणेंना अहमदाबाद विमानतळावर गाठून या दौऱ्याचे नेमके औचित्य काय? असा प्रश्नही विचारला. पण कोणतंही उत्तर न देता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
संबंधित बातम्या
राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?
नारायण राणे यांचा राजकीय प्रवास