अहमदाबाद/मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अहमदाबादमध्ये एक तास चर्चा झाली. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
नारायण राणे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि अमित शाह यांची भेट महत्वाची मानली जात आहे.
नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. मात्र अजून तरी नारायण राणे आणि मुख्यमंत्री किंवा अमित शाह यांच्या भेटीविषयी नेमकी माहिती समोर आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांची तातडीची भेट घेतली. या भेटीमध्ये राणेंवरच चर्चा झाली असल्याची माहिती एबीपी माझाच्या सुत्रांनी दिली आहे.