Kailas Gorantyal On Maharashtra Political Crisis : अजित पवारांनी  (Ajit Pawar) राष्ट्रवादीत केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकरणात मोठा भूकंप आला आहे. तर यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असून, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी देखील यावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारसह अजित पवारांवर निशाणा साधला आहे.'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डबल इंजन नव्हे तर ट्रिपल इंजन सरकार झाले असल्याचे म्हणत आहे. पण तीन-चार इंजन झाल्यावर प्रवासी कोठे बसणार,' असा खोचक टोला गोरंट्याल यांनी लगावला आहे. 


जालना येथे माध्यमांशी बोलताना गोरंट्याल म्हणाले की, महाराष्ट्रात जे काही घडत आहे ते राज्यातील जनतेला न पटणारे असून, अशा घटना दोनदा घडली आहे. यापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते आणि हे बंड खोक्यावर झाला होता. तर काल जो काही राष्ट्रवादीमध्ये बंड झाला आहे तो ईडीमुळे झाला आहे. काल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे भाषण ऐकत होतो. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता डबल इंजन नव्हे तर ट्रिपल इंजन सरकार झाले आहे. आता सांगा तीन-चार इंजन झाल्यावर प्रवासी बसणार कुठे, त्याला डब्बेतर पाहिजे. त्यामुळे हे जे काही प्रवासी आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या डब्ब्यातच बसणार आहेत. तसेच इंजनमध्ये फक्त चालक असतो दुसरे कोणीही नसतो हे महाराष्ट्राला माहित आहे. 


पुढे बोलताना गोरंट्याल म्हणाले की, ईडीच्या धमक्या दिल्या जात आहे. राष्ट्रवादी पक्षात यांनी हा घोटाळा केला, त्यांनी तो घोटाळा केल्याचा आरोप केले जातात. मात्र दुसऱ्या दिवशी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला जातो. या सर्वांमुळे राज्यातील सर्वसामन्य माणूस नाराज आहे. दोन दिवसांपूर्वी आरोप करून तिसऱ्या दिवशी त्यांना मंत्रीपदावर बसवतात. 'मेरे पिछे ईडी लगा दे, मुझको भी मंत्री बना दे'..कैसे कैसे को बनाया, मुझको भी बना दे, मालदार खाता मुझको भी मिला दे...असा प्रकार झाला असल्याचे गोरंट्याल म्हणाले आहेत. 


जाणाऱ्यांना पश्चाताप होईल 


या सर्व घडमोडीमुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. जे काही डब्बे आहेत, त्यात प्रवासी महाविकास आघाडीचे आहेत. त्यांच्याकडे फक्त इंजिन आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात मला काही जायचं नाही, पण जाणाऱ्यांना पश्चाताप होईल एवढ नक्की सांगतो. तर लोकशाहीचा खून एकदा नाही तर दोनदा झाला आहे. लोकांच्या मतावर तुम्ही निवडून येतात, ज्या पक्षावर प्रेम आहे त्याला लोकं मतदान करतात. हे लोकं संजय राऊत यांना म्हणतात की तुम्ही आमच्या मतावर निवडून आले, पण तुम्ही कोणाच्या मतावर निवडून आले आहेत. त्यामुळे या लोकांना 2024 मध्ये माहित पडेल कोणाची किती ताकद आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Amol Mitkari On BJP : 'भाजपचे हिंदुत्व बेगडी'; भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराची दुसऱ्याच दिवशी टीका