मुंबई : भाजपने नगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलं असलं तरी सिंधुदुर्गमधल्या देवगडचा बालेकिल्ला राखण्यात पक्षाला अपयश आलं आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.


गेली 35 वर्ष राखलेला बालेकिल्ला भाजपच्या हातातून निसटून काँग्रेसच्या हाती गेला आहे. आमदार नितेश राणे यांचं हे मोठं यश मानलं जात आहे. देवगड-जामसांडे नगरपंचायतीत काँग्रेसला 10 जागा मिळाल्या, तर भाजपला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं.

देवगड-जामसंडेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश चांदोसकर विराजमान झाले आहेत. भाजप राज्यात सुसाट असताना देवगडमध्ये झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर 'किंगमेकर नितेश राणे' यांचे पोस्टर झळकत आहेत.