नवी दिल्ली : महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.


'महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. गोरगरीब जनता आणि भाजपच्या विकासाच्या राजकारणाचा हा विजय आहे.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर म्हटलं आहे.

https://twitter.com/narendramodi/status/803235814343741442
'भाजप कार्यकर्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं मी अभिनंदन करतो. तळागाळापर्यंत त्यांनी केलेल्या कार्यामुळे भाजपवर विश्वास ठेवावासा वाटला' या शब्दात मोदींनी कौतुक केलं आहे.

https://twitter.com/narendramodi/status/803236301650599936
तब्बल 22 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 55 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे.