Nana Patole : आमच्या विरोधात जो बोलेले त्याच्यावर कारवाई करु, अशा इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अमंलबजावणी भाजप सरकार (Bjp Government) करत असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर झालेली कारवाई नवीन नाही. ही दबाव व त्यांना ब्लॅक मेल करण्यासाठी कारवाई सुरु असल्याचे पटोले म्हणाले. अजून किती लोकांना जेलमध्ये टाकायचं हे त्यांनी ठरवावं. परंतू, भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीनं हलवू शकणार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल यात दुमत नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले.


मूळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट 


नाना पटोले हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आपले पाप लपवण्यासाठी अशी कारवाई करणं हे नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलवून वातावरण बदललं गेलं. मूळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला जो घाव केला. त्याला जनता कधीही विसरणार नाही. राज्यपालांनी भाजप कार्यालय उघडले आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही पटोले यावेळी म्हणाले.


भाजपचं कटकारस्थान जनतेला समजलय


आता भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठविण्याचं काम आता ते करणार आहेत. एका पार्टीला संपवून आम्ही कसे जिवंत राहू, अशा पद्धतीचं घाणेरडं राजकरण 75 वर्षात कोणी केलं नाही. हे खालच्या पातळीच व लोकशाहीला घातक राजकरण केंद्रातील भाजप सरकार करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. केंद्र सरकारच्या देश विकण्याच्या धोरणाच्या, केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल, त्याच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करु असे धोरण भाजपचे असल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळं ही करावाई नवीन नाही. हे दबासाठी कारवाई सुरु असल्याचे पटोले म्हणाले. अन्याय किती करायचे हे त्यांनी ठरवावे असेही ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत देशाची जनता अशा अत्याचारी व्यवस्थेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले.   


महत्त्वाच्या बातम्या: