Nana Patole : काँग्रेसनं कायमच महात्मा गांधींचा वध अश्या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलाय आहे. पण महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करतांना नाना पटोले यांनींच महात्मा गांधींचा वध झाला असे शब्द वापरले आहेत.
नथूराम गोडसे यांच्या समर्थकांकडून महात्मा गांधी यांचा वध झाला, अशा शब्दाचा उच्चार केला जातो. याला काँग्रसकडून नेहमीच विरोध दर्शवण्यात आला आहे. पण आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला, असं वक्तव्य करण्यात आले आहे.
नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक -नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. नाना पटोले यांना बोलताना भान राहत नाही, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. नाना पटोलेंच्या पोटातील ओठावर आले का? असा प्रश्न भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. या वक्तव्यामुळे नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
आज 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांची आजच्याच तारखेला नथुराम गोडसेनं हत्या केली होती. आजच्याच दिवशी नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य करत नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या : PHOTO | माझे जीवन हाच माझा संदेश- महात्मा गांधीMahatma Gandhi Death Anniversary : गांधींजींचे 'हे' महत्वाचे विचार आपल्याला जीवनात नेहमीच उपयोगी पडतीलमराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live