Nana Patole : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जपानमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केलं. नाफेडकडून (Nafed) कांदा खरेदी सुरु झाल्याचा दावा खोटा आहे. म्हणूनच आज चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आला असल्याचे नाना पटोले म्हणाले. कांदा निर्यात शुल्क धोरण हे शेतकऱ्यांना फायद्यासाठी नव्हे तोट्यासाठी आणल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.


नाना पटोले हे चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी कांदा निर्यात धोरणाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करणार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.


कांदा निर्यात शुल्क धोरण मागे घेत नाहीत तोपर्यंत आवाज उठवणारचं


मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं असल्याचे नाना पटोले म्हणाले. कांदा निर्यात शुल्क धोरण मागे घेत नाहीत, तोवर आवाज उठवणारच असल्याचे पटोले म्हणाले. केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावे असे पटोले म्हणाले. 


केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातवर तब्बल 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणारआहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणार आहे. यामुळं पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त होतेय. म्हणूनच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प असल्यानं जवळपास 45 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे यात आमचेच नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी ग्रामीण भागातून आपला माल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत. कांद्याचे लिलावही केले जात आहेत. मात्र, दर कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. नाफेडकडून दिला जाणारा दरही कमी असल्याचं नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलतांना म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Onion : नाफेडतर्फे कांदा खरेदी म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण,  स्वाभिमानीची सरकारवर जोरदार टीका