RailWay Block : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अंत्यत महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी आणि रविवारी ( 8- 9 ऑक्टोबर) डहाणू रोड स्टेशनवर ब्लाॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. तसेच या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही बाहेरगावच्या गाड्यांना अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल. डहाणू रोड स्थानकात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा फटका बसणार आहे.
कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार?
जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
- 8 आणि 9 ऑक्टोबर दरम्यान अनेक WR गाड्या शॉर्ट टर्मिनेट/अंशत: रद्द केल्या जातील. वाणगव, बोईसर, पालघर आणि डहाणू रोड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत
मेल एक्सप्रेस
- ट्रेन नंबर 22929 (डहाणू रोड - वडोदरा) 8 आणि 9 ऑक्टोबरला डहाणू रोड आणि भिलाड स्टेशन दरम्यान अंशतः रद्द राहिल. भिलाड स्टेशमवरून ट्रेन सुटेल
- ट्रेन नंबर 22390 (वडोदरा- डहाणू रोड) 8 आणि 9 दरम्यान डहाणू रोड आणि भिलाड स्टेशन दरम्यान अंशतः रद्द राहिल. भिलाड स्टेशमवरून ट्रेन सुटेल
- ट्रेन नंबर 12480 (बांद्रा टर्मिनस - जोधपूर) 9 ऑक्टोबरला वांद्रे टर्मिनस आणि सूरत स्टेशन दरम्यान अंशतः रद्द राहिल. ट्रेन सुरत येथून सुटेल
- ट्रेन नंबर 12933 (मुंबई सेंट्रल - अहमदाबाद) 9 ऑक्टोबर रोजी मुंबई सेट्रल आणि वलसाड स्थानकादरम्यान अंशतः रद्द राहिल. ट्रेन वलसाड स्टेशनवरून सुटेल
- ट्रेन नंबर 12479 (जोधपूर - वांद्रे टर्मिनस) 8 ऑक्टोबरला ट्रेन जोधपूर येथून सुटेल आणि सुरत स्थानकात थांबवण्यात येईल. सुरत ते वांद्रे टर्मिनस स्थानकादरम्यान अंशतः रद्द राहिल
- ट्रेन नंबर 19417 (मुंबई सेंट्रल - अहमदाबाद) 9 ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल ते वलसाड स्थानकादरम्यान अंशतः रद्द राहिल. ट्रेन वलसाड स्थानकातून येथून सुटेल
- ट्रेन नंबर 12934 (अहमदाबाद - मुंबई सेंट्रल) 9 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथून ट्रेन सुटेल आणि वलसाड स्थानकात थांबवण्यात येईल. वलसाड ते मुंबई सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द राहिल.
- ट्रेन नंबर 19426 (नंदुरबार - मुंबई सेंट्रल) 8 ऑक्टोबरला ट्रेन नंदुरबार येथून सुटेल आणि वापी स्टेशनला थांबवण्यात येईल. वापी ते मुंबई सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द राहिल.
शटल/पॅसेंजर
ट्रेन नंबर 19002 (सुरत- विरार) 8 ऑक्टोबर रोजी सुरत येथून सुटेल त्यानंतर सांजन येथे थांबवण्यात येईल. सांजन ते विरार दरम्यान ट्रेन अंशतः रद्द राहिल.