कोल्हापूर : कोल्हापुरात बनावट नोटा छापणारा डॉक्टर हा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचा पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तौफिक मुल्लानी यांनी हा आरोप केला आहे.


दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणात भाजपच्या सहभागाची चौकशी करावी, अशी मागणीही मुल्लानी यांनी केली आहे. कोल्हापुरातील डॉक्टर सुधीर कुंबळेला बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.

भाजपच्या मंत्र्यांचे नाव घेऊन कुंबळेकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही मुल्लानी यांनी केला आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आरोपी सुधीर कुंबळे शूज खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा खपवत होता. दुकानदार औरंगजेब नदाफ यांच्या दुकानात तो शूज घेण्यासाठी आला होता. मात्र नदाफ यांच्या चाणाक्ष नजरेमुळे डॉक्टरचा डाव उजेडात आला.

पोलिसांनी सुधीर कुंबळेकडून बनावट नोटा आणि साधनसामुग्री जप्त केली आहे. तसंच त्याच्याकडे 100 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटाही पोलिसांना सापडल्या आहेत.

संबंधित बातम्या :


शूज खरेदीसाठी 2000 च्या बनावट नोटांची छपाई, डॉक्टर गजाआड