Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधला याचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन पुकारलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देत सांगितले की, ''उद्यापासून राज्यात 'मोदी माफी मागो आंदोलन पुकारण्यात येणार आहे.'' 


उद्यापासून 'मोदी माफी मागो' आंदोलन
नाना पटोले यांनी सांगितले की, ''उद्या सर्व भाजप कार्यालयांसमोर आम्ही महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा निषेध करणार आहोत. हातात फलक घेऊन 'मोदी माफी मागो' अशी मागणी करणार आंदोलन करण्यात येईल. कोरोना काळात महाराष्ट्रानं काय काम केलं हे विचारायचं असेल तर नरेंद्र मोदींनीच उत्तर दिलंय. अंगावर याल तर शिंगावर घेऊ असं म्हणतायेत आम्ही हिसेचं समर्थन करत नाही. पण तुम्ही पंतप्रधानांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचं समर्थन करणार असाल तर  तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात.''


पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha