Coldplay concert ticket controversy: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ब्रिटिश रॉक बँड कोल्ड प्ले (coldplay concert) च्या शोच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोपाखाली समन्स बजावल्यानंतर बुक माय शो चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक हेमराजानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला सागर बंगल्यावर आल्याचं वृत्त आहे. काळाबाजाराच्या आरोपाचे दोनदा समन्स बजावल्यानंतरही गुपचूप गृहमंत्र्यांच्या दारात आलेल्या हेमराजानी यांना  फडणवीसांनी भेटण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे . कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या आरोपावरून सरकारने याबाबत कठोर पावले उचलली आहेत . त्यानंतर पोलिसांसमोर उपस्थित राहण्याऐवजी थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी हेमरजांनी पोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . 


कोल्डप्लेच्या तिकीटांचा काळाबाजार?


मुंबईत जानेवारीमध्ये होणाऱ्या बहुप्रतिक्षित कोल्ड प्ले कॉन्सर्टची सर्वत्र चर्चा आहे.या कॉन्सर्ट ची तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नात असताना बुक माय शो वरही या तिकिटाची विक्री सुरू झाली आहे .मात्र या तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने बुक माय शो वर कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसले . कंपनीच्या तांत्रिक प्रमुखांनी रविवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून आपले म्हणणे मांडले होते. मात्र त्याला हेमराजानी यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.


चढ्या दराने विकली तिकीटे


 बुक माय शोच्या प्रमुखांना शनिवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकीटे मूळ किंमतीपेक्षा 30 ते 40 टक्के चढ्या भावानं विकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.   'कोल्डप्ले'च्या तिकीटांचा मोठा काळाबाजार 'कोल्डप्ले' कॉन्सर्ट आयोजक कंपनीकडून बुक माय शोनं तिकीट विक्रीचे हक्क मिळवले आहेत. मात्र तिकीटांच्या काळ्याबाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन तिकीटविक्री सुरू होताच काही काळासाठी जाणूनबुजून सर्व्हर डाऊन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. अमित व्यास नामक वकिलानं दाखल केलेल्या तक्रारीची कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  


 



फडणवीसांनी नाकरली भेट


कोल्ड प्ले च्या कॉन्सर्टच्या तिकिटात संदर्भात मुंबईच्या आर्थिक गुन्हा शाखेने बुक माय शो वर दुसऱ्यांदा समन्स बजावला आहे . 27 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी समाज बजावल्यानंतर आशिष हेमराजाने हे पोलिसांसमोर उपस्थित राहिले नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना समज बजावण्यात आले . गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर पोहोचलेल्या आशिष हेमराजांनी यांची भेट नाकारत मंत्रिमंडळाच्या बैठकीस ते निघून गेल्याचे वृत्त आहे .मुंबई पोलिसांनी चौकशीला बोलावलेले असतानाही बुक माय शो चे संस्थापक आशिष हेमराजाने हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी कशासाठी गेले असा सवाल उपस्थित केला जात असल्याने या प्रकरणात नक्की काय गौडबंगाल आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे .