Maharashtra Weather Update: राज्यात आधीच तापमान कमी झाले आहे.हाडं गोठवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली असून यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाच्या नोंदींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात थंडीची लाट येण्यास पोषक वातावरण असल्याचं IMD ने सांगितलंय. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबत X माध्यमावर पोस्ट करत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या राज्यात 11 ते 14 अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, हे तापमान आणखी खाली जाऊ शकते असं ते म्हणालेत. शिवाय राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता वाढली असून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या 24 तासांत किमान तापमान 8 ते 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
थंडीची लाट कुठे आणि कधीपासून?
हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 15 व 16 म्हणजे आज थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर, तापमान निचांकी राहण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलय. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरले आहे.
येत्या 48 तासांत..
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, लक्षद्विपला जोडून अरबी समुद्राच्या पूर्वेकडीलभागात चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासांत पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र व कोकण भागात तापमान 1 ते 2 अंशांनी वाढणार आहे.
हेही वाचा-