धुळे/सातारा : जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे देशभरात थंडीची लाट पसरली असून महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये 6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली, तर वेण्णा लेक परिसरात शून्य अंश तापमान नोंदवलं गेलं.
धुळ्यातही तापमानात घट झाली आहे. एक दिवस अगोदर 13 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या धुळ्यात 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लोकांना स्वेटर बाहेर काढावे लागले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात अचानक चढ उतार जाणवत आहे. पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.