मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र जाणार कोपर्डीच्या बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. आज बारामती विमानतळावर उतरुन मुख्यमंत्री कोपर्डीसाठी रवाना होणार आहेत. बारामतीतून भिगवण मार्गे मुख्यमंत्री अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डीला भेट देतील.


 

 

कोपर्डी बलात्काराचा मुद्दा गेले काही दिवस विधानसभेतही गाजत आहे. मुख्यमंत्र्यांना पीडितांना भेटायलाही वेळ नाही, अशा शब्दात विरोधकांनीही कोंडी केली. अखेर आज मुख्यमंत्री कोपर्डीला भेट देत आहेत.

 

 

कायदा व सुव्यवस्थेमुळे अनेक जणांना कोपर्डीला जाण्यापासून रोखण्यात आलं. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनाही काल कोपर्डीला जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. त्यानंतर मुख्यमंत्री आज कोपर्डीला भेट देत आहेत. मुख्यमंत्र्यांची ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली असून कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.