CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah LIVE : नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी राज्याला 1200 कोटी रुपये द्या, मुख्यमंत्री ठाकरेंची मागणी

CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : भावी सहकाऱ्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

Continues below advertisement

Background

CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोमवारी वर्षावर आढावा घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात स्वतंत्र बैठक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नक्षलवादी परिसरात रखडलेल्या विकासकामांचाही कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. नक्षलवादी कारवाया या ग्रामीण भागातून शहरी भागात वाढत असल्यानं केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज दिल्लीत महत्त्वाच्या  बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांच्यासोबत सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची चर्चा होते का? याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

दिल्ली दौऱ्यासाठी आज (रविवारी) सकाळीच मुख्यमंत्री विमानानं दिल्लीला जाणार आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते बैठकीला हजर राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सध्या महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या प्राकर्षाने दिसून येत आहे. या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून पुढील वाटचाल कशी असावी? यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण होते. त्यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली होती. याव्यतिरिक्त त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र बैठकही पार पडली होती. त्यावेळी  राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. 

Continues below advertisement
13:25 PM (IST)  •  26 Sep 2021

नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी राज्याला 1200 कोटी रुपये द्या, मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मागणी

#BREAKING : नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी राज्याला 1200 कोटी रुपये द्या, मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मागणी 

10:26 AM (IST)  •  26 Sep 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, दिल्लीतील विज्ञान भवनात बैठकीला सुरुवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला दिल्लीतील विज्ञान भवनात सुरुवात झाली आहे. 




10:01 AM (IST)  •  26 Sep 2021

दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असली तरी सगळे उपस्थित राहणार नाहीत

दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असली तरी सगळे उपस्थित राहणार नाहीत, काही राज्यांनी आपले मुख्य सचिव, डीजीपी पाठवले आहेत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे नवीन पटनाईक उपस्थित राहणार नाहीत

07:13 AM (IST)  •  26 Sep 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीसाठी मुंबईतून रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थान वर्षाहून सकाळी 6.30 च्या दरम्यान दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. नक्षलवादी क्षेत्राच्या विकास कामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





07:11 AM (IST)  •  26 Sep 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्वाची बैठक

CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोमवारी वर्षावर आढावा घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात स्वतंत्र बैठक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sponsored Links by Taboola