मुंबई : दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील पती-पत्नीला कोरोना व्हायरसची लागल झाल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांचाही शोध घेणे सुरू केलं आहे. या दाम्पत्याची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तिघेही कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. दरम्यान राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं बुधवारी (10 मार्च)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली आहे.


कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण सोमवारी पुण्यात आढळून आले आहेत. दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसंच उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयपीएलसह इतर महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलायचे की नाही यंसदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धेला होणारी गर्दी पाहून स्पर्धा रद्द करण्यासंदर्भात बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, ही भूमिका ठाम ठेवली होती. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री काय आदेश देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Coronavirus | कोरोनाच्या धास्तीनं पुण्यातील मुलाची चिंता करणाऱ्या आईची कहाणी, मनाला चटका लावणारा फोन


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरांमध्ये मोठी खबरदारी घेतली जातेय. कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाज्यांवर स्टरलायझेशनसाठी मोठी यंत्रणा बसवण्यात आलीय. ही यंत्रणा बारा वाजता याची सुरुवात केली जाणार आहेत. तसंच मंदिर परिसरातील स्वच्छतेचीही मोठी काळजी घेतली जात आहे. नाशकातल्या इगतपुरी विपश्यना केंद्रानं महत्त्वाचं पाऊल उचललंय. उद्यापासून आयोजित केलेली सर्व शिबिरं विपश्यना केंद्राकडून रद्द करण्यात आली आहेत. उद्यापासून सुरु होणाऱ्या शिबिरासाठी 600 साधक इगतपुरीच्या केंद्रात येणार होते. दरम्यान परदेशी नागरिकांना डिसेंबर महिन्यापर्यंत केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. औरंगाबाद पैठण येथे होणारा नाथषष्ठीचा सोहळा एका वर्षापुरता स्थगित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. लोकहित लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलाय. तसं एक पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढून नाथ मंदिर ट्रस्ट या सोबतच इतर विभागांना देखील दिलं आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | पुण्यातील दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु; नागरिकांनी घाबरू नये, सतर्क राहावे : राजेश टोपे

Coronavirus | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाचवर; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता