1. मुंबई-ठाण्यासाह 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा, दुकानं हॉटेलच्या वेळा वाढवणार, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातले अनेक जिल्हे निर्बंधांच्या कचाट्यात


2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर, पुरामुळं झालेल्या नुकसानाचा घेणार आढावा


3. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित कुटुंबांच्या बँक खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती


4.  बारावीच्या निकालाची तारीख आज बोर्डाकडून जाहीर होण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्यापर्यंत बारावीचा निकाल लावणं बंधनकारक


5. मनसे चित्रपट सेनेच्या मदतीनं मराठी अभिनेत्रीकडून कास्टिंग काऊचचा पर्दाफाश, कास्टिंग डिरेक्टरला भररस्त्यात चोप


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 जुलै 2021 | शुक्रवार | ABP Majha



6. नाशिक जिल्ह्यातल्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याला राहणारे नागरिक भयभीत, अवैध खोदकामामुळं दुर्घटना होण्याची भीती, तर ब्रह्मगिरीला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यासाठी प्रक्रिया सुरु


7. मुंबईलगतच्या विरारमध्ये ICICI बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, नागरिकांनी पाठलाग करुन एका दरोडेखोराला पकडलं


8. पुणे मेट्रोची वनाझ ते आयडीयल कॉलनी दरम्यानची चाचणी सुरु, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखवला हिरवा झेंडा 


9. इच्छा नसतानाही दिल्लीत यावं लागलं, नव्या मंत्र्यांसाठी आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरींचं वक्तव्य


10 . ऑलिम्पिकमध्ये तिरंदाज दीपिका कुमारीचा विजयी निशाणा, क्वार्टर फायनलमध्ये धडक, तर पी. व्ही. सिंधूसमोर सेमीफायनल गाठण्याचं लक्ष्य