मुंबई : कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेलं कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण तसंच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही दिलेल्या सूचनांचे तुम्ही पालन केले आहे, तसेच यापुढे देखील आपण एकीने युध्द जिंकू. कोरोना संकटाच्या काळात थोडासा संयम पाळा, असं मुख्यमंत्री म्हणाले.


माझे कुटुंब-माझी जबाबदारी योजना 


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो 'तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो' पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा. फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे.. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


CM Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत


पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत.  मिशन बिगिन अगेनअंतर्गत काही गोष्टी सुरु केल्या आहेत. कार्यालयातील उपस्थिती वाढवत आहोत. वाहतुकीचे निर्बंध शिथिल केले आहेत. आयुष्याची गाडी मागावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत. आयुष्य पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, फेस टु फेस बोलू नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावु नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


तुम्ही जिथे जात नाहीत तिथं दुर्गम भागात देखील मी पोहोचलो - मुख्यमंत्री


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, इतरांसोबत जेवताना समोरासमोर बसू नका, बाजुला असेल, काळजी घेतली तर दुर्दैवाने कोणाला संसर्ग झाला असेल तर दुसर्‍याला होणार नाही. हे युद्ध आहे, यात खारीचा तरी वाटा उचला. हे युद्ध आहे, जनता जर युद्धात सहभागी झाली तर जिंकु. जिम - रेस्टॉरंट देखील सुरू करण्याचा प्रयत्न आहे परंतु सुरक्षिततेच्या नियमावलीस प्राधान्य. नियमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.  मुख्यमंत्री घरात बसून काम करतात. बाहेर पडा, असं म्हटलं जातं. मात्र मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बैठक घेत आहे, काम करत आहे. जिथे तुम्ही जात नाही अशा दुर्गम भागात देखील मी पोहोचलो आहे, व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठका ऑनलाइन घ्या, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांसाठी ' जे विकेल ते पिकेल' योजना
शेतीमध्ये क्रांती करायची आहे. महाराष्ट्राची 'प्रयोगशील राज्य' ही ओळख आहे. आजपर्यंत जे 'पिकेल ते विकेल' होतं, परंतु आता जे 'विकेल ते पिकेल' योजना आणत आहोत. हमी भाव नाही, आता हमखास भाव! , असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. शेतकरी त्याच्या परिवारातील 'बैल' कारण तो त्याच्या परिवारातील सदस्यच असतो. त्याला बैल देखील गहाण टाकावा लागतो. म्हणून मी नवीन योजना आणत आहे. कुठेही उणीव न ठेवता सर्व आघाड्यांवर सरकार कार्यरत आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी अधिक उभे आहोत कारण शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्तांना 18 कोटींची मदत देण्याची घोषणा केली. विक्रमी कापूस उत्पादन झाले त्याची खरेदी केलेली आहे, महाराष्ट्रातील कुपोषित साडे सहा लाख बालकांना मोफत दुधफुकटी वाटप केले आहे, सव्वा लाख स्तनदा मातांना पण ही भुकटी मोफत देत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात आहे. त्याविषयी मी बोलेन पण आता नाही, वेळ आल्यावर मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन पण माझं अधिक लक्ष कोरोनावरच असणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे